सुलभ कर्ज योजना
सुवर्ण कर्ज (Gold Loan)
घरात पडून असलेल्या सोन्यावर तत्काळ कर्ज मिळवा. अत्यंत सुलभ प्रक्रिया आणि कमीत कमी कागदपत्रे!
EMI कॅल्क्युलेटर
₹७,९३९
₹१,२७,९३९
१ तोळ्यावर १.२० लाख!
तुमच्या १ तोळा (१० ग्रॅम) सोन्यामागे तब्बल १,२०,०००/- रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
- KYC: आधार कार्ड, पॅन कार्ड, २ पासपोर्ट आकाराचे फोटो.
- पत्ता पुरावा: लाईट बिल किंवा रेशन कार्ड.
- सोन्याची पावती: उपलब्ध असल्यास दागिन्यांची मूळ पावती.
सुलभ सुवर्ण कर्ज योजना
पैशांची तातडीची गरज असताना घरात ठेवलेले सोने तुमचा सर्वात मोठा आधार बनू शकते. श्री स्वामी समर्थ परिवार पतसंस्थेची 'सुवर्ण कर्ज योजना (Gold Loan)' तुम्हाला तुमच्या सोन्यावर तत्काळ आणि सुरक्षित कर्ज मिळवून देते.
शेतीची कामे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा व्यवसायासाठी अचानक पैशांची गरज भासल्यास कोणतेही जाचक कागदपत्र न देता काही मिनिटांत कर्ज उपलब्ध होते. तुमच्या सोन्याची १००% सुरक्षितता ही आमची हमी आहे.
विशेष ऑफर
सोन्याच्या चालू बाजारभावानुसार, आता मिळवा १ तोळा (१० ग्रॅम) सोन्यामागे तब्बल १,२०,०००/- रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा!
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- कर्ज मर्यादा (Loan Amount): या योजनेअंतर्गत तुम्ही ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ घेऊ शकता.
- आकर्षक व्याजदर: स्पर्धात्मक आणि परवडणारे व्याजदर. (अचूक आणि अद्ययावत व्याजदराच्या माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा).
- तत्काळ मंजुरी: फक्त काही मिनिटांत सोन्याचे मूल्यांकन आणि रोख किंवा थेट खात्यात जमा रक्कम.
- १००% सुरक्षितता: तुमच्या दागिन्यांची सुरक्षित आणि विमा (Insured) युक्त तिजोरीत जपणूक केली जाते.
- कोणतेही छुपे चार्जेस नाहीत: अत्यंत पारदर्शक मूल्यांकन (Valuation) प्रक्रिया.