सुलभ कर्ज योजना
गृह कर्ज आणि प्रॉपर्टी मॉर्गेज लोन
नवीन घर खरेदी करण्यासाठी सुलभ गृह कर्ज किंवा तुमच्या स्वतःच्या मालमत्तेवर (Property) तारण कर्ज मिळवा.
EMI कॅल्क्युलेटर
₹६,१९,२२०
₹१६,१९,२२०
स्वप्नातले घर किंवा मालमत्तेवर कर्ज!
घर खरेदी, बांधकाम किंवा तुमच्या स्वतःच्या जागेवर तारण कर्ज मिळवा.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
- KYC: आधार कार्ड, पॅन कार्ड, २ फोटो (अर्जदार आणि जामीनदार)
- उत्पन्नाचा पुरावा: मागील ३ महिन्यांची सॅलरी स्लिप किंवा ३ वर्षांचे IT रिटर्न
- मालमत्तेची कागदपत्रे: खरेदीखत, ७/१२ उतारा, मिळकत पत्रिका, बांधकाम परवानगी (Building Permission), व सर्च रिपोर्ट
- बँक स्टेटमेंट: मागील ६ महिन्यांचे अपडेटेड बँक स्टेटमेंट
१. सुलभ गृह कर्ज (Home Loan)
स्वतःच्या हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'श्री स्वामी समर्थ परिवार' घेऊन आले आहे अत्यंत सुलभ आणि पारदर्शक 'गृह कर्ज' योजना. आम्ही कर्ज प्रक्रियेतील जाचक अटी दूर करून, कमीत कमी कागदपत्रांसह जलद कर्ज मंजुरी देण्यावर भर देतो.
नवीन घर खरेदी
नवीन फ्लॅट, रो-हाऊस किंवा बंगल्याच्या खरेदीसाठी.
घर बांधकाम
स्वतःच्या प्लॉटवर नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी.
दुरुस्ती आणि नूतनीकरण
जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी (Renovation / Extension).
२. प्रॉपर्टी मॉर्गेज लोन (Loan Against Property)
तुमच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर, फ्लॅट, जागा किंवा व्यावसायिक मालमत्ता (Commercial Property) असल्यास, तुम्ही त्यावर 'तारण कर्ज' घेऊ शकता. हे कर्ज तुम्ही व्यवसायाच्या विस्तारासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर मोठ्या खर्चासाठी वापरू शकता.
निवासी मालमत्ता तारण
स्वतःच्या घराच्या किंवा फ्लॅटच्या कागदपत्रांवर कर्ज.
व्यावसायिक मालमत्ता तारण
दुकान, गाळा किंवा ऑफिसच्या जागेवर तारण कर्ज.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
- कर्ज मर्यादा (Loan Amount): या योजनेअंतर्गत तुम्ही ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ घेऊ शकता.
- आकर्षक व्याजदर: स्पर्धात्मक आणि परवडणारे व्याजदर. (अचूक आणि अद्ययावत व्याजदराच्या माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा).
- जलद मंजुरी (Fast Processing): विनाकारण विलंब न करता वेळेत मूल्यांकन आणि कर्ज मंजुरी.
- लवचिक कालावधी: कर्ज परतफेडीसाठी सोयीस्कर आणि दीर्घ कालावधीचे पर्याय उपलब्ध.